संगोपन
डॅा. अंजली भाटवडेकर यांचं हे पुस्तक ‘आपलं महानगर’ या वृत्तपत्रातल्या ‘ संगोपन’ या सदरातील काही लेखांचं संकलन आहे. लहान बाळांचा शारीरिक विकास अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. त्यांच्या आहाराबद्दल पालकांच्या मनात अनेक शंका, गैरसमज असतात. एक वर्षाच्या आतील बाळांच्या विकासाबद्दल थोडीशी धास्तीही असते. याच वयोगटातल्या मुलांच्या पालकांना स्तनपान व इतर आहारविषयक मार्गदर्शन या पुस्तकातून केलं आहे. याशिवाय या वयोगटातल्या मुलांच्या काही नेहमीच्या किरकोळ आजारांबद्दलही माहिती यात सापडेल. उदाहरणांच्या आधारे सोप्या भाषेत केलेलं विवेचन पालकांना उपयोगी ठरावं.