एका पुनर्जन्माची कथा

एका पुनर्जन्माची कथा

हे प्रांजळ कथन आहे स्वानुभवातून आलेलं. डॅा. मनोज भाटवडेकर यांना ऱ्हुमॅटॅाइड आर्थ्रायटिस नावाचा अत्यंत वेदनादायी आजार झाला. या आजाराशी झगडता झगडता त्यांचं मानसिक बळ संपुष्टात येऊ पाहत होतं. अचानक त्यांना ध्यानमार्गाची ओळख झाली. या नवीन पथावर चालता चालता ते स्वत:च्या संपर्कात आले. त्यांच्या शारीरिक- मानसिक प्रक्रियांमध्ये आमूलाग्र बदल घडू लागला. त्यातून ते वेदनामुक्त आणि औषधमुक्त झाले. हे पुस्तक याच प्रवासाचा वेध घेतं. या पुस्तकाने अनेकजणांना ध्यानाला उद्युक्त करण्याची आणि जगण्याची उभारी देण्याची बहुमोल कामगिरी केली आहे.

संगोपन

संगोपन

डॅा. अंजली भाटवडेकर यांचं हे पुस्तक ‘आपलं महानगर’ या वृत्तपत्रातल्या ‘ संगोपन’ या सदरातील काही लेखांचं संकलन आहे. लहान बाळांचा शारीरिक विकास अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. त्यांच्या आहाराबद्दल पालकांच्या मनात अनेक  शंका, गैरसमज असतात. एक वर्षाच्या आतील बाळांच्या विकासाबद्दल थोडीशी धास्तीही असते. याच वयोगटातल्या मुलांच्या पालकांना स्तनपान व इतर आहारविषयक मार्गदर्शन या पुस्तकातून केलं आहे. याशिवाय या वयोगटातल्या मुलांच्या काही नेहमीच्या किरकोळ आजारांबद्दलही माहिती यात सापडेल. उदाहरणांच्या आधारे सोप्या भाषेत केलेलं विवेचन पालकांना उपयोगी ठरावं. 

આપણું બાળક તો આમાં નથી ને ?

“કહેવા જેવું ઘણું છે, કહ્યા જ કરું છતાંય ખૂટે નહીં એટલું! મારું સઘળું કહેતા રહેવું પર્યાપ્ત પણ નથી. ખાસ કરીને એટલા માટે, કે ગમે તેટલું કહ્યા પછી, સાંભળીને સમજવા અને પચાવવાની જે પ્રક્રિયા છે તે સૌથી મહત્વની છે. જાગૃતિ લાવનારી અને ક્રાંતિકારી ઘટના ભલે સામૂહિક સ્તરે જોવા મળે, પણ મૂળભૂત તે વ્યક્તિગત ઘટના છે. કોઈ પણ બદલાવ લાવવા માટે આપણા પોતાનામાં બદલાવાની તૈયારી હોવી જોઈએ. આપણે બે હાથે ખોબો ધરવો છે કે મુઠ્ઠી વાળી રાખવી છે, એ ઉપર સઘળું નિર્ભર છે. માટે જ, આ લખાણ દ્વારા કોઈ દાવો કરવાનો મારો ઇરાદો નથી. માત્ર એક અરીસો સામે ધરવો છે, કે જેમાં પોતાનું પ્રતિબિંબ સૌએ જોઈને, જે તારવવું હોય એ તારવવું, અને જો ગાંઠે બાંધવા જેવું લાગે તો બાંધવું.”

– ડૉ. મનોજ ભાટવડેકર

आपलं मूल यात नाही ना ?

आपलं मूल यात नाही ना?

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॅा. मनोज भाटवडेकर म्हणतात,”सांगण्यासारखं बरंच आहे! कितीही सांगितलं तरी ते संपेल असं नाही. कारण सांगितलं कितीही, तरी ऐकण्याची समजण्या- उमजण्याची प्रक्रिया ही त्याहूनही जास्त महत्त्वाची असते. जागृती, क्रांती या घटना सामूहिक पातळीवर घडताना जरी दिसल्या तरी त्या मुळात वैयक्तिक आहेत. कुठल्याही बदलासाठी आपल्याकडे मुळात बदलण्याची तयारी लागते. आपण हातांची ओंजळ केलीय की मुठी आवळल्या आहेत यांवर सर्व अवलंबून असतं. म्हणूनच मला या लिखाणातून कसलाही दावा करायचा नाही, कुठलाही पवित्रा घ्यायचा नाही. फक्त एक आरसा आपल्यापुढे ठेवायचा आहे, ज्यात आपणच आपलं प्रतिबिंब बघता आलं तर बघावं आणि मनाशी खूणगाठ बांधता आली तर बांधावी.”

आपली मुलं आणि आपण

आपली मुलं आणि आपण

या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॅा. मनोज भाटवडेकर म्हणतात,” पालकत्व ही अशीच हळूहळू अनुभवानं कौशल्यपूर्ण होत जाणारी प्रक्रिया आहे. त्यातली सर्वसाधारण ठळक तत्त्वं या पुस्तकात सापडतील. ती आपल्या बाबतीत कितपत आणि कशी लागू होतात हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. ( जसं- भज्यांची पाककृती वाचून भजी करताना पीठ किती उंचीवरून गरम तेलात टाकावं म्हणजे हातावर तेल उडणार नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं ). तेव्हा हे पुस्तक वाचणाऱ्या पालकांना माझं कळकळीचं सांगणं एकच- या कहाण्यांमध्ये गुंतून राहू नका, त्याबरोबर वाहवत जाऊ नका. वस्तुनिष्ठ आणि शोधक नजरेने या लेखांचं वाचन- मनन- चिंतन केलंत, तर कदाचित त्यात दडलेली समस्यांची ‘उत्तरं’ सापडतीलही!”